मुंबई : आलिया रणवीरचं लग्न मोठ्या धुमधडाक्यात पार पडलं. त्यांच्या लग्नासाठी जवळचे मित्र आणि नातेवाईक पोहोचले होते. रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर तिच्या धाकट्या भावाच्या लग्नासाठी पोहोचली होती. तिला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं, जिथे ती कॅज्युअल लूकमध्ये दिसली. रणबीर कपूरची मोठी बहीण रिद्धिमा कपूर साहनी खूप सुंदर आहे. कपूर कुटुंबातील मुलींमध्ये करिश्मा आणि करीना हेडलाईनमध्ये असतात. तर रिद्धिमाला लाईमलाईट आवडत नाही.
रिद्धिमा कपूर साहनीचा जन्म १५ सप्टेंबर १९८० रोजी मुंबईत झाला होता. तिने लंडनमधील अमेरिकन इंटरकॉन्टिनेंटल युनिव्हर्सिटीमधून डिझायनिंग आणि मार्केटिंगमध्ये पदवी संपादन केली आहे. सिने इंडस्ट्रीतून आलेले असूनही तिने चित्रपटात करिअर न करण्याचा आणि फॅशन डिझायनर बनण्याचा निर्णय घेतला. दुसरं कारण म्हणजे कपूर कुटुंबातील मुलींना तेव्हा चित्रपटात काम करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे तिच्या वडिलांनाही तिने चित्रपटात काम करावं असं वाटत नव्हतं.
जरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे फोटो व्हिडिओ चाहत्यांसह शेअर करत असते. ज्यामध्ये ती खूप ग्लॅमरस दिसते. योगा करतानाही रिद्धिमा कपूर फोटो शेअर करत असते.
रिद्धिमा एक यशस्वी ज्वेलरी डिझायनर आहे. जिच्या ज्वेलरी ब्रँडचे बरीच नाव आहे. रिद्धिमा 'आर ज्वेलरी' नावाच्या ब्रँडची मालक आहे आणि ती करोडोंची कमाई करते. 25 जानेवारी 2006 रोजी तिने बिझनेसमन भरत साहनीशी लग्न केलं. तिला एक मुलगी देखील आहे.