खासदार नुसरत जहां रुग्णालयात दाखल

कोलकाताच्या अपोलो ग्लेनईगल्स रुग्णालयात दाखल

Updated: Nov 18, 2019, 05:37 PM IST
खासदार नुसरत जहां रुग्णालयात दाखल title=

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहां यांची तब्येत अचानक खराब झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नुसरत जहां यांना रविवारी श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यानंतर त्यांना कोलकाताच्या अपोलो ग्लेनईगल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

नुसरत यांचे प्रवक्ता अभिषेक मजूमदार यांनी नुसरत जहां यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. मजूमदार यांनी, आता नुसरत यांची तब्येत ठिक असून त्यांना सोमवारपर्यंत रुग्णालयातून सोडण्यात येणार असल्याचं सांगितलं.

Nusrat Jahan

लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये कलाविश्वातील अनेक कलाकारांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. बंगालमधील अभिनेत्री नुसरत जहाँ यांना जनतेने भरघोष मतांनी निवडून दिलं. नुसरत यांनी पश्चिम बंगालच्या बशीरहाटमधून तृणमूल काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. तीन लाखांहून अधिक मतं मिळवून नुसरत जहाँ निवडून आल्या. 

खासदार नुसरत जहाँचा विवाहसोहळा थाटात संपन्न

१९ जून रोजी तुर्कीमध्ये व्यावसायिक निखिल जैन आणि नुसरत यांचा हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने विवाहसोहळा पार पडला.