रामदास आठवले

रामदास आठवले

रामदास आठवलेरिपब्लिकन पक्ष (ए)

आरपीआयचे नेते रामदास आठवले यांचा जन्म २५ डिसेंबर १९५९ ला सांगली जिल्ह्यातील अगलगाव येथे झाला. १९७२ मध्ये दलित पँथरची स्थापना झाली तेव्हा ते पँथरमध्ये सक्रिय झाले. रामदास आठवले हे भारताच्या १४ व्या लोकसभेचे खासदार होते. लोकसभेत त्यांनी महाराष्ट्रातील पंढरपूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. वडाळ्यातील सिद्धार्थ विहारमध्ये शिक्षण घेत असताना त्यांचा लोकांशी संपर्क वाढला. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे ही मागणी जोर धरू लागली आणि या आंदोलनात रामदास आठवले सहभागी झाले. नामांतराच्या या लढाईत त्यांनी शिवसेना आणि सरकारशी संघर्ष केला.

१९९० मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. ते महाराष्ट्राचे समाजकल्याण आणि परिवहन मंत्री झाले. १२ व्या लोकसभेत १९९८-९९ मध्ये ते उत्तर मध्य मुंबईमधून निवडून गेले होते. २००९ मध्ये ते शिर्डी लोकसभा मतदार संघातून पराभूत झाले. त्यानंतर २०११ मध्ये त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला रामराम केला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते युतीमध्ये आले. मोदी सरकारमध्ये ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळविणारे ते एकमेव रिपब्लिकन नेते आहेत.

आणखी बातम्या

'आरक्षण घेऊन ब्राह्मणांनी भारतात राहावं'

'आरक्षण घेऊन ब्राह्मणांनी भारतात राहावं'

ब्राह्मण समाजाला आरक्षण नसल्यामुळे ते परदेशात जात असतील तर त्यांनी आरक्षण घ्यावं आणि इथेच राहावं, असं वक्तव्य आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी केलं आहे.

Apr 30, 2017, 17:24 PM IST
आठवले जेव्हा मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतात...

आठवले जेव्हा मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतात...

आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली आहे.

Apr 12, 2017, 21:53 PM IST
पर्रिकरांआधीही हे मंत्री शपथ घेताना चुकले होते

पर्रिकरांआधीही हे मंत्री शपथ घेताना चुकले होते

मनोहर पर्रिकर हे गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना चुकले. चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना त्यांनी सुरूवातीला मंत्री म्हणून शपथ घेतली.

Mar 14, 2017, 18:06 PM IST
दलितांच्या मतांमुळे भाजपला मिळालं महायश - रामदास आठवले

दलितांच्या मतांमुळे भाजपला मिळालं महायश - रामदास आठवले

उत्तर प्रदेशात भाजपने पहिल्यांदा ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर तर विरोधकांना ही चांगलाच धक्का बसला. विरोधकांनीही पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं. ही मोदी लाट असल्याचं अनेक विरोधकांनी मान्य ही

Mar 12, 2017, 13:29 PM IST
कृष्णा किरवलेंच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, सीबीआय चौकशीची मागणी

कृष्णा किरवलेंच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, सीबीआय चौकशीची मागणी

प्राध्यापक कृष्णा किरवले यांच्या हत्येप्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या प्रितम पाटील याला अटक करण्यात आलीय. 

Mar 04, 2017, 20:53 PM IST